🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज(१३ जाने.)भाजपचे माजी आमदार विजय गव्हाणे(Vijay Gavhane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी बोलत असतांना गव्हाणे यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा केला आहे. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) हे स्जेजवरचे नट असून केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane)आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील(Radhakrushn Vikhe-Patil हे भाजप चालवतात’, असे खळबळजनक वक्तव्य गव्हाणे यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे.
यावेळी बोलत असतांना गव्हाणे म्हणाले की,’माझी राजकीय मैत्री ही प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंशी होती आणि त्यामुळेच मी भाजपमध्ये गेलो. परंतु मुंडेनंतर आता भाजप तशी राहिली नाही. आता भाजपमध्ये बहुजन समाजातील लोकांना जागाच नाही. देवेंद्र फडणवीस हे फक्त स्टेजवरचे नट आहेत. पण खरा पक्ष नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील चालवतात.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’आमचे राजकारण वेगळे असून शाहू-फुले यांचा महाराष्ट्र घडवणार नेता हे फक्त शरद पवार आहेत. भाजपमध्ये पंकजा ताईंचे पण हाल सुरू आहेत. त्या पक्षात का आहेत? हे माहिती नाही’, असेही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
मराठवाड्यातील नांदेड आणि औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक; दिवसेंदिवस वाढतेय रुग्ण संख्या!
- ‘शेतकऱ्यांसाठी पैसा नसतो, मात्र स्वतःच्या आमदारासाठी कोट्यवधींची माफी?’; केशव उपाध्ये यांचा ठाकरेंना सवाल
-
राज्यात ऑक्सिजनच्या मागणीत वाढ; मुख्यमंत्र्यांनी दिला कडक निर्बंधांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
