मुंबई : राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात या दोन्ही नेत्यांदरम्यान २० मिनिटं चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यापूर्वी २०१९ मध्ये २० नोव्हेंबरला शरद पवारांनी मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या रुपात २३ नोव्हेंबरला महाराष्ट्रत सकाळी राजकीय भूकंप झाला होता. त्यामुळे आता पुन्हा राजकारणात अवकाळी वादळ येणार का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या आताच्या भेटीचं टाईमिंग महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात अनेक घडामोडी सुरु आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरु आहेत. काल (५ एप्रिल) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संपत्ती देखील ईडीने जप्त केली. राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान काल शरद पवार यांनी काल त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक भाजप आमदार उपस्थित होते. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
२०१९ मध्ये नरेंद्र मोदींना भेटल्यावर शरद पवार काय म्हणाले होते?
अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न आपण पंतप्रधान मोदींकडे मांडला. तसेच या नुकसानीकडे मोदींचे लक्ष वेधल्याचे शरद पवार यांनी ट्विटरवरून सांगितले होतो. मात्र या भेटीदरम्यान कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
२३ नोव्हेंबर २०१९ ला काय घडले?
२३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. राज भवनात हा शपथविधी पार पडला होता. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या युतीने देशभरात खळबळ माजवली होती. अडीच दिवस टिकलेल्या या सरकारची सर्वत्र चर्चा झाली होती.
महत्वाच्या बातम्या :
पवारांनी घेतली मोदींची भेट; भातखळकर म्हणाले, “ED तपास बंद होण्याची शक्यता…”
IPL 2022 : RCB विरुद्ध युझवेंद्र चहलची जबरदस्त बॉलिंग; पत्नी धनश्रीचं ‘क्रेझी सेलिब्रेशन’ व्हायरल!
शरद पवारांनी घेतली मोदींची भेट; राजकीय चर्चांना उधान
“घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान’; मोदींचा पुनरुच्चार
IPL 2022 KKR vs MI : आज दोन मुंबईकरांमध्ये लढत..! वरचष्मा मात्र रोहितसेनेचाच; वाचा कारण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

