Share

IPL 2022 : RCB विरुद्ध युझवेंद्र चहलची जबरदस्त बॉलिंग; पत्नी धनश्रीचं ‘क्रेझी सेलिब्रेशन’ व्हायरल!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएलचा १३ वा सामना बँगलोर आणि राजस्थान यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये राजस्थानचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने शानदार गोलंदाजी केली. मात्र, आरसीबी संघाने हा सामना चार विकेटने जिंकला. युजवेंद्र चहलने ओव्हरमध्ये केवळ १५ धावा देत २ बळी घेतले. युझीच्या कामगिरीने त्याची पत्नी धनश्री वर्माही खूप खूश होती. तिच्या स्टँडमधील सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामन्याच्या ९व्या षटकात एक विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले. फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने (Yuzvendra chahal) विराट कोहलीला (virat kohli) धावबाद केले. पुढच्याच चेंडूवर RCBचा फलंदाज डेव्हिड विली (David willey) क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर मैदानात राजस्थानच्या चाहत्यांमध्ये उत्साह दिसला. युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा (Dhanshree verma) क्रेझी सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

https://twitter.com/swadeshLokmat/status/1511388032506953734?s=20&t=ReV9s0pOp2cO-zuy9Df7vg

डेव्हिड विली बाद झाल्यनंतर स्टँडमध्ये बसलेल्या धनश्रीने उड्या मारत आनंद व्यक्त केला . चहलची पत्नी धनश्रीच्या आनंदाला पारावार उरला नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. धनश्री इतकी खूश होती की तिने ही विकेट पडल्याचा आनंद उत्साहात साजरा करायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर काही जणांनी तिच्या प्रतिक्रियेवर टीका केली तर काहींना तिचा हा सेलिब्रेशन भावला आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!