Share

IPL 2022 KKR vs MI : आज दोन मुंबईकरांमध्ये लढत..! वरचष्मा मात्र रोहितसेनेचाच; वाचा कारण!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२चा दुसरा आठवडा संपत आला आहे आणि आज या लीगचा १४वा सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात होणार आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर दोन्ही संघांमधील सामना होणार आहे. श्रेयस अय्यरच्या कोलकाताने चालू हंगामातील त्यांच्या तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर मुंबई इंडियन्स त्यांचे दोन्ही सामने गमावल्यानंतर आठव्या स्थानावर आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआर संतुलित दिसत आहे. मात्र, काही प्रमुख फलंदाजांचा फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय ठरत असून, या यादीत कर्णधार अय्यरचेही नाव आहे. आंद्रे रसेलचे फॉर्ममध्ये येणे हे चांगले लक्षण आहे. पॅट कमिन्सही संघात दाखल झाला आहे.

मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली. संघाची फलंदाजी आधीच थोडी कमकुवत दिसत होती आणि आघाडीच्या फलंदाजांचा खराब फॉर्म चिंतेचा विषय आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव खेळण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करत आहे, पण त्याला इतर गोलंदाजांची साथ मिळालेली नाही. डॅनियल सॅम्स प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे.

हेड टू हेड आकडेवारीत मुंबई इंडियन्सचा वरचष्मा राहिला आहे. मुंबईने २२ सामने जिंकले असून केकेआरने ७ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील शेवटच्या सामन्यांमध्ये केकेआरने फक्त एकदाच विजय मिळवला आहे. कर्णधार रोहित शर्माने कोलकाताविरुद्ध मुंबई इंडियन्सकडून ८९९ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या सध्याच्या गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहने कोलकाताविरुद्ध १५ विकेट घेतल्या आहेत. सुनील नरिनने केकेआरकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध २३ विकेट घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!