Share

पवारांनी घेतली मोदींची भेट; भातखळकर म्हणाले, “ED तपास बंद होण्याची शक्यता…”

Published On: 

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(sharad pawar ) यांच्या निवासस्थानी राज्यातील सर्व खासदारांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असतानाच आता शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (narendra modi) भेट घेतली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“दिल्लीत संसदेचे अधिवेशन चालू आहे. त्यामुळे काही कामानिमित्त शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले असतील. या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकारणावर किंवा राज्यातील परिस्थितीवर काही परिणाम होणार नाहीये. तसेच कुणाला मनातल्या मनात जर वाटत असेल की, एक मराठी नेता पंतप्रधानांना भेटला त्यामुळे मराठी माणसावर चालू असलेला अन्याय होणार नाही. तर असे काही होणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणा या कायद्याच्या चौकटीत राहुल आपले कार्य करतात. तसेच नरेंद्र मोदी देखील कुणाच्याही दबावाखाली न येता न्यायाने, कायद्याने काम करतात.”, असे म्हणत अतुल भातखळकर यांनी अप्रत्यक्ष संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

दरम्यान संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन पवार यांनी मोदींची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाहीये. मात्र राज्यातील घडामोडीनुसार ही भेट महत्वाची मानली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

शरद पवारांनी घेतली मोदींची भेट; राजकीय चर्चांना उधान

“घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान’; मोदींचा पुनरुच्चार

IPL 2022 KKR vs MI : आज दोन मुंबईकरांमध्ये लढत..! वरचष्मा मात्र रोहितसेनेचाच; वाचा कारण!

IPL 2022: शिष्य पडिक्कलला बाद केल्यानंतर गुरु कोहलीने केले ‘असे’ सेलिब्रेट; रिऍक्शनचा VIDEO व्हायरल!

समंथापासून विभक्त झाल्यानंतर नागा चैतन्यने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!