मुंबई: कालच (५ एप्रिल) शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(sharad pawar ) यांच्या निवासस्थानी राज्यातील सर्व खासदारांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असतानाच आता शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (narendra modi) भेट घेतली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.
संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन पवार यांनी मोदींची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाहीये. मात्र राज्यातील घडामोडीनुसार ही भेट महत्वाची मानली जात आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील आमदार आणि खासदारांसाठी सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे चहापानाचा कार्यक्रम होता. तर रात्री शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी पवारांनी या सर्व आमदारांशी संवाद साधला. आणि आज त्यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. आजच संजय राऊत यांनी INS विक्रांतबाबत मोठा खुलासा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आताची शरद पवार आणि मोदी यांची भेट महत्वाची मानली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: शिष्य पडिक्कलला बाद केल्यानंतर गुरु कोहलीने केले ‘असे’ सेलिब्रेट; रिऍक्शनचा VIDEO व्हायरल!
समंथापासून विभक्त झाल्यानंतर नागा चैतन्यने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“सरकामध्ये एक तरी व्यक्ती समाधानी आहे का?”; मुनगंटीवारांचा सवाल
CNG-PNG महाग करणाऱ्या केंद्र सरकारला राज्यातील भाजप नेते जाब विचारणार का?; राष्ट्रवादीचा सवाल
“संजय राऊतांनी एक हाक द्यावी, शिवसैनिक रस्त्यावर उतरतील” – वरुण सरदेसाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

