नवी दिल्ली : आज भारतीय जनता पार्टीचा ४२ वा स्थापना दिवस आहे. आजच्या दिवसाचं औचित्य साधून मोदींनी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांना संबोधन करताना मोदींनी घराणेशाहीच्या राजकारणावर टीका केली आहे.
काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की, “काही राजकीय पक्षांनी मागील अनेक दशकांपासून फक्त व्होट बँकेचं राजकारण केले आहे. काही लोकांनाच आश्वासन आणि काही लोकांना त्रास देण्याचं काम असच चालू राहिलं. देशात दोन प्रकारचं राजकारण सुरु आहे. एक परिवार भक्तीचं तर दुसरं राष्ट्रभक्तीचं. केंद्रीय स्तरावर काही राजकीय पक्ष आहेत ते आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी काम करतात. स्थानिक पातळीवरील राजकारणावर कुटुंबातील सदस्यांचाच दबदबा राहतो. यामुळेच मागील अनेक दशकांपासून देशाचं नुकसान होत आलं आहे. देशातील तरुणांना आता कळू लागले आहे की, घराणेशाहीने चालणारे पक्ष लोकशाहीचे शत्रू आहेत. लोकशाहीसोबत खेळ करणारे हे पक्ष संविधान आणि त्याच्या व्यवस्थांचाही खेळ करत आहेत.
लोकशाहीविरोधी शक्तींना नेस्तनाबूत केल्याशिवाय आपण थांबायचं नाहीये, असा एल्गारही मोदींनी पुकारला आहे.
महत्वाच्या बातम्या :
“सरकामध्ये एक तरी व्यक्ती समाधानी आहे का?”; मुनगंटीवारांचा सवाल
CNG-PNG महाग करणाऱ्या केंद्र सरकारला राज्यातील भाजप नेते जाब विचारणार का?; राष्ट्रवादीचा सवाल
“संजय राऊतांनी एक हाक द्यावी, शिवसैनिक रस्त्यावर उतरतील” – वरुण सरदेसाई
IPL 2022: ऑरेंज- पर्पल कॅपची संगीत खुर्ची सुरूच; विजयानंतर आरसीबीचे खेळाडू एक पाऊल पुढे
रणबीर सोबतच्या अफेअर्सविषयी आलियाची रोखठोक प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

