🕒 1 min read
मुंबई : मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरुआशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.
यासंदर्भात त्यांनी तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्र दिलेले आहे. या पत्रावरुन हे स्पष्ट होते की, म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता आणि त्यामुळे या चौकशीच्या प्रकरणाचे धागेदोरे हे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात आहेत.
शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर-
मराठी माणसाला न्याय देण्याकरता आणि त्यातील खरे सत्य बाहेर येण्याकरता या संदर्भातली एक उच्चस्तरीय कालबद्ध मर्यादेची चौकशी करावी अशी मागणी भातखळकर यांनी या पत्राद्वारे केली आहे. शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर असल्याचा गंभीर आरोप देखील अतुल भातखळकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Whatsapp Latest Update | व्हॉट्सअपचे नवीन फीचर तुम्हाला चूक सुधारण्याची देईल संधी,जाणून घ्या!
- Supriya Sule | “बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवरुन शरद पवारांवर टीका करायचे, यातच…”, सुप्रिया सुळे यांची दसरा मेळाव्याबाबत प्रतिक्रिया
- Ambadas Danve | “… म्हणून गुलाबराव पाटलांनी त्यांचा आजा बदलला”, अंबादास दानवेंचा घणाघात
- Maharashtra Rain Updates | राज्यभरात पावसाचा जोर कमी, मराठवाड्यासह विदर्भात ‘यलो अलर्ट’!
- Supriya Sule | “शहराला अजूनही पालकमंत्री नाही, म्हणूनच मी खासदार या नात्याने…’, सुप्रिया सुळेंनी प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
