Share

Supriya Sule | “शहराला अजूनही पालकमंत्री नाही, म्हणूनच मी खासदार या नात्याने…’, सुप्रिया सुळेंनी प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अनेक वेळा शहराला पालकमंत्री न मिळाल्याने नाराजगी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांना झटका देत सत्तेत आले. त्यानंतर त्यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार केला. मात्र, अजूनही पुणे शहराला पालकमंत्री मिळालेला नाही. यावरच पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंनी नाराजगी व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रीयाः

पहिले अजित पवार पालकमंञी असताना पुण्यात दर आठवड्यात आढावा बैठक व्हायची, मात्र, आता सत्ताधारी तसं काहीच करत नाही त्यामुळे विकासकामं पेंडिंग राहताहेत. तसंच 23 गावातील कचरा आणि पाणी समस्या अजूनही तशीच आहे त्यामुळे असे असंख्य प्रश्न प्रशासक आणि शहाराला पालकमंत्री नसल्याने प्रलंबित आहेत. म्हणूनच खासदार या नात्याने पुणे मनपा आयुक्तांची भेट घेऊन या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला असल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी दिली आहे.

अर्थमंत्री निर्मला सितारामन बारामतीत येतायत याचा मला आनंदः

अर्थकारणाला मदत करणाऱ्या अनेक चांगल्या बॅंका आपल्याकडे आहेत. अर्थकारण या भागातलं चांगलं आहे, ज्याची केंद्र सरकारने दखल घेतलेली आहे. त्या बॅंकांच्या त्यांना भेटीगाठी घ्यायच्या असतील तर अर्थातच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन बारामतीत येतायत याचा मला आनंद, त्यांचे स्वागत आहे, असं देखील सुळे म्हणाल्या.

दरम्यान, निर्मला सितारामन यांनी कृषी विज्ञान केंद्र आणि इतर संस्था पाहव्यात यासाठी त्यांना आमंत्रण देण्यात आलय. जर त्यांना वेळ असेल तर मी फिरून त्यांना बारामती दाखवेन. दौरा बघा किंवा पक्ष बघा नेतृत्व करणारे नेते हे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे आहेत, असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!