Share

Ambadas Danve | “… म्हणून गुलाबराव पाटलांनी त्यांचा आजा बदलला”, अंबादास दानवेंचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते अंबादास दानवे पोहोचले आहेत. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे. गुलाबरावांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंबादास दानवे यांची प्रतिक्रीया :

गुलाबराव पाटील यांनी आपल्या फायद्यासाठी आजा बदलला, असा आरोप परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. प्रबोधनकारांनी सर्वसामान्यांची सेवा हेच हिंदुत्व आहे, असं सांगितलं आहे. गुलाबराव पाटलांचं मागचं भाषण तुम्ही ऐका, आजा शिवसेना के पास आजा, बाळासाहेब ठाकरे के पास आजा, असं हेच बोलत होते आणि आता बंडखोरी केली, आता तुमचा आजा बदलला, ते आता एकनाथ शिंदे झाले आहेत, काही हरकत नाही, अशी घणाघाती टीका अंबादास दानवेंनी केली आहे.

गुलाबराव पाटील यांची टीका :

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी आज पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर तीव्र टीका केली होती. आदित्य ठाकरे हे केवळ इस्टेटीचे वारसदार आहेत, तर आम्ही विचारांचे वारसदार आहोत, असं गुलाबराव पाटील म्हणाले होते.

यादरम्यान, दसरा मेळाव्यावरुन, आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाच्या विचारांचा आहे, मात्र, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शरद पवार आणि सोनिया गांधींच्या मिक्स विचारांचा होणार असल्याची टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे. आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल!, असंही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!