पुणे : शिवसेना पक्षाच्या दसरा मेळावा वरुन सत्ताधारी विरोधक वारंवार वादाच्या भोवऱ्यात दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दसरा मेळाव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी ते सत्तेत असतानाची एक आठवण देखील सांगितली आहे. तसेच त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका देखील केली आहे.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रियाः
आम्ही जेव्हा शिवसेनेच्या विरोधात होतो तेव्हा शिवसेनेच्या बाबतीत असं कधीही केले नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेचा भव्य मेळावा व्हायचा, आम्हीही तो उत्सुकतेनं पहायचो, आमच्यावरती काय टिका करतात याची आम्हाला उत्सुकता असायची, असं सुळे म्हणाल्या.
विरोधक हा दिलदार असायला हवाः
बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवरुन शरद पवारांवर टीका करायचे, यातच तर गम्मत आहे, विरोधक हा दिलदार असायला हवा नाहीतर राजकारण आणि समाजकारण करायला मज्जा कशी येणार, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं असून अप्रत्यक्षरित्या त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या :
- Ambadas Danve | “… म्हणून गुलाबराव पाटलांनी त्यांचा आजा बदलला”, अंबादास दानवेंचा घणाघात
- Maharashtra Rain Updates | राज्यभरात पावसाचा जोर कमी, मराठवाड्यासह विदर्भात ‘यलो अलर्ट’!
- Supriya Sule | “शहराला अजूनही पालकमंत्री नाही, म्हणूनच मी खासदार या नात्याने…’, सुप्रिया सुळेंनी प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा
- Narayan Rane | नारायण राणेंना झटका! अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे हायकोर्टाचे आदेश
- Maharashtra Board Exam Time Table | महाराष्ट्र बोर्डाकडून १०वी, १२वीच्या परिक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ तारखेपासून होणार परिक्षा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

