🕒 1 min read
मुंबई: चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर (Jacqueline Fernandez) ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने जॅकलिनची ७.२७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. सुकेश चंद्रशेखरसोबतच्या नात्यामुळे जॅकलीन बराच काळ ईडीच्या रडारवर होती. या प्रकरणीच ईडीने जॅकलिन फर्नांडिसवर मोठी कारवाई केली आहे.
दरम्यान ईडीच्या आरोपपत्रात म्हटले आहे की, सुकेश चंद्रशेखर जॅकलिनसाठी चार्टर्ड विमान बुक करायचा. सुकेश जॅकलीनच्या पीए मार्फत तिच्यापर्यंत पोहोचला होता. त्याने तिला चार्टर प्लेनमध्ये भेटायला बोलावले होते. जामिनावर असताना सुकेश चंद्रशेखरने चार्टर्ड विमानात 8 कोटी खर्च केले होते. सुकेशने कानातले, ब्रेसलेट आणि बांगड्या, जॅकलीनला सोन्याची चेन भेट म्हणून दिली होती. जॅकलिनला 52 लाख किमतीचा घोडा आणि 9 लाख किमतीची एक पर्शियन मांजरही भेट देण्यात आली होती. याशिवाय 10 कोटींचे गिफ्टही दिले होते.
सुकेशवर 200 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असून जॅकलीनने ईडीच्या चौकशीत सांगितले होते की, “मी सुकेश चंद्रशेखरला शेखर रत्न वेला या नावाने ओळखते. डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत सुकेशने माझ्याशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण मी त्याचा फोन घेतला नाही.” दरम्यान सुकेशने जॅकलिनच्या बहिणीला दीड लाख अमेरिकन डॉलर्सचे कर्ज दिल्याचेही समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पाठिंबा आहे तोपर्यंत…”, अजित पवारांचे मोठे वक्तव्य
- “इम्तियाज जलील यांनी आधी भोंगे हटवावे, आम्ही त्यांचा सत्कार करू” – संदीप देशपांडे
- IPL 2022 GT vs RCB : बलाढ्य गुजरातसमोर बंगळुरुचं आव्हान; डु प्लेसिसनं जिंकला टॉस!
- “लकडावालाकडून वहिनी काय घेत असाव्या?”, फोटो पोस्ट करत मनीषा कायंदेंचा अमृता फडणविसांवर निशाणा
- IPL 2022 : शुबमन गिलनं Swiggyला फटकारलं..! एलोन मस्ककडं केली ‘ही’ भन्नाट मागणी; वाचा तर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
