पुणे : ओबीसी आरक्षणावरुन राज्याच्या राजकारणाचे वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारला चांगलाच दणका बसला आहे. त्यातच आता संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनीही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले आहे.
ओबीसी (OBC) राजकीय आरक्षण मिळणार नाही. आमच्या अस्तित्वाची लढाई असून ती आम्हाला सक्षमपणे लढावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की, जोपर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार इम्पिरिकल डेटा देत नाही, तोपर्यंत आरक्षण लागू करता येत नाही. ओबीसींचे प्रचंड नुकसान होणार आहे. हे केंद्र आणि राज्य सरकारचे पाप आहे, असं संतोष शिंदे म्हणाले आहेत.
केंद्र सरकार हा इम्पिरिकल डेटा देत नसेल तो मागासवर्गीय आयोगामार्फत गोळा करणे गरजेचे होते परंतु राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग केवळ नावाला नेमला आहे, त्याला एक रुपयाचा निधी या राज्य सरकारने दिलेला नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणा विषयी राज्य सरकार उदासीन असल्याचे यावरून दिसून येते. सगळे ओबीसी नेते खोटारडे असून राजकारण आरक्षण संपवण्याची सुपारी यांनी घेतली आहे. पक्षाचे राजकारण करण्यासाठी आरक्षणाचे लचके तोडत आहेत, असं संतोष शिंदे म्हणाले आहेत.
भाजपच्या नेत्यांमध्ये दम नाही केंद्राकडे इम्पिरिकल डेटा मागण्याची ते फक्त राज्यात सोडून बुद्धीचा राजकारण करत आहेत याला देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे जबाबदार आहे. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आतातरी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे, असे संतोष शिंदे म्हणाले आहेत.
सरकारची जातीनिहाय जनगणना करण्याची तयारी नाही. म्हणून आता तरी राज्य सरकारने या निवडणुका पुढे ढकलायला हव्यात व मागासवर्गीय आयोगाला 435 कोटी निधी उपलब्ध करून देऊन लवकरात लवकर इंपीरिकल डेटा गोळा करण्याचे काम करायला हवे अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाज या केंद्र सरकार व महाविकासआघाडीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील नेते ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. ओबीसी आरक्षण हा आमचा घटनात्मक अधिकार आहे ते आम्हाला मिळालेच पाहिजे, असं संतोष शिंदे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- राजकारणात लगीन सराई; हर्षवर्धन पाटील-ठाकरेंची जुळली सोयरीक
- नगरसेवकांची संख्या वाढविण्याच्या अध्यादेशास खंडपीठात आव्हान; ‘मनसे’च्या सुहास दाशरथेंचा आक्षेप!
- शिवसेनेत अंतर्गत वाद; माजी जिल्हाप्रमुखांचा माजी महापौरांवर भ्रष्टाचाराचा आरोप!
- रजिस्टर लग्न करत जितेंद्र आव्हाडांच्या मुलीने सर्वांपुढेच ठेवला एक चांगला आदर्श
- शासकीय जिल्हा समित्यांच्या यादीत घोळ; नाना पटोलेंकडून निवडीला स्थगिती!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

