🕒 1 min read
State Govt | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत महाविकास आघाडीला सत्तेवर पायउतार केलं. मात्र, यानंतर मंत्रीमंडळ विस्तारावरुन विरोधकांनी जोरदार घणाघात केला. त्यामुळे राज्य सरकारचा दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच अखेर राज्य सरकार (State Govt) चा दुसरा मंत्रीमंडळ कधी होणार याचा मुहर्त ठरला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह येत्या 26 नोव्हेंबरला पुन्हा गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गुवाहाटीहून आल्यावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
तसेच, ख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सर्व 50 आमदार दोन दिवस गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते गुवाहाटीला जाऊन कामाख्यादेवीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्रात परतल्यावर लगेच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती समोर आलेली आहे,
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. तसेच मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज होणाऱ्या आमदारांना महामंडळ देण्याचा शिंदे सरकारचा प्लॅन असल्याचं समोर येतं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Pratap Sarnaik | “मुख्यमंत्र्यांनी मला ९०० खोके दिलेत, पण…”, प्रताप सरनाईक यांचं खळबळजनक विधान
- Travel Tips | कुटुंबासोबत फिरायला जाण्यासाठी ‘ही’ आहेत भारतातील सर्वोत्तम ठिकाणं
- Raosaheb Danve | महाराष्ट्रात खरंच मध्यावधी निवडणुका लागणार? रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया
- Chandrashekhar Bawankule | “अजूनही 20-25 आमदारांचं आम्हाला छुपं समर्थन”; बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
- Skin Care Tips | ‘या’ घरगुती पद्धती वापरून पायावरील टॅनिंग करा दूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
