Share

शासकीय जिल्हा समित्यांच्या यादीत घोळ; नाना पटोलेंकडून निवडीला स्थगिती!

Published On: 

औरंगाबाद : राज्य शासनाच्या राज्यस्तरीय, जिल्हा व तालुकास्तरीय विविध शासकीय महामंडळ आणि समित्यांवरील काँग्रेस पक्षाच्या यापूर्वीच्या यादीला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या नावांची नवीन यादी पाठविण्याचे आदेश शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांना दिले आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष हिशाम उस्मानी (Hisham usmani) यांनी दिली.

राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाआघाडीचे सरकार आहे. सत्तेत येऊन राज्य सरकारला दोन वर्षे झाली आहेत. नुकतीच पालकमंत्री सुभाष देसाई(Subhash desai) यांनी सत्तेचा वारा कार्यकर्त्यांना मिळावा, यासाठी शासनाच्या विविध समित्यांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावली. त्याची यादी त्यांनी रितसर प्रसिद्ध केली. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही यादी प्रसिद्ध झाली. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शहराध्यक्ष हिशाम उस्मानी(Hisham usmani) यांनी आपण संपकमंत्री किंवा प्रदेश समितीला शहरातील कार्यकर्त्यांची यादी दिलेली नाही.

असे असताना यादी कशी प्रकाशित झाली, यावर उस्मानी यांनी आक्षेप घेतला. पक्षातील काही नेत्यांनी षडयंत्र रचून शहराध्यक्षांना बदनाम करण्याच्या हेतूने विशिष्ठ वर्गातील कार्यकर्त्यांची वर्णी समितीवर लावली होती. ही पण उस्मानी यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole), संपर्कमंत्री अमित देशमुख(Amit deshmukh) यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली. पटोले यांनी सदस्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली व नवीन यादी करण्याचे आदेश दिले. यापूर्वीची यादी कोणी पालकमंत्र्यांना दिली याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पक्षाचे प्रभारी मुजाहेद यांना या प्रकरणी चौकशीसाठी नियुक्त केले आहे. मुजाहेद यांनी बैठक घेऊन कार्यकर्त्यांकडे विचारणा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!