मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट व भाजप यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली. फडणवीस यांना नाईलाजाने पक्षश्रेष्ठींचे आदेश मानावे लागले असेही म्हटले जात होते. मात्र या सगळ्यांमध्ये आता शिंदे-भाजप सरकार चांगलेच रंगात आलेले पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी आता थेट शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत सकाळी उठून फक्त पत्रकार परिषदा घेतत. राऊतांचा मोठ्या मोर्चातील एक फोटो दाखवा. या लोकांनी कधी ढेकून तरी मारला का? आमच्यासोबतच्या चार महिलांना हे लोक वेश्या म्हणतात. असं बोलणाऱ्यांना लोक जोड्याने मारतील, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना शिरसाट म्हणाले की, ‘कधीही झेंडा हातात न घेतले आम्हाला शहाणपणा
शिकवतात. काल आलेले लोक आम्हाला, २ शिवसैनिकांना शिकवतात. ३७ वर्षे शिवसेनेत खूप चांगलं काम केलं. आज प्रवक्ते बाजू मांडतात ते नवीन आलेलं आहेत. आम्ही लढून शिवसेना जनसामान्यात रुजवली आहे. ३९ बंडखोर आमदार एकत्र राहिले याचा आनंद वाटला. एकामेकांच्या भावना आम्हाला समजल्या. बंडखोरी केली तेव्हा भविष्यात काय होईल याची आम्हाला चिंता नव्हती. कामच होणार नव्हती तर या सत्तेत थांबण्यात काहीच अर्थ नव्हता, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.
शिवसेनेत बंड पुकारण्यात बाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, ‘मतदार संघातील काम होत नसल्यामुळे आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला. मतदारांच्या विश्वासाला तड़ा जावू द्यायचा नव्हता. उद्धव ठाकरे यांच्या सोबतचा लोकांनी साहेबांची दिशाभूल केली. बंडखोरी होवून नये असं आम्हाला शेवटपर्यंत वाटत होतं. पण आम्हाला कोणी समजूनच घेतलं नाही. उलट अरेरावीची भाषा झाली. आम्हाला धमकावलं गेलं. त्यामुळे सर्वच दुखावले गेले, असंही ते म्हणाले.
दरम्यान काल झालेल्या विशेष अधिवेशनात शिवसेनेतील बंडखोर नेते व शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनीही संजय राऊत यांचा चांगला समाचार घेतला होता. गुलाबराव पाटील म्हणाले होते की, ‘आमच्या जीवावर निवडून येणारे आम्हाला राजकीय धडे शिकवतात.’ अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना उद्देशून टीका केली. शिंदे गटातील बऱ्याचश्या आमदारांची संजय राऊत अंबाबतची भूमिका ही अतिशय विरोधाची असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या :


