Share

ENG vs IND : संतापजनक..! मॅचदरम्यान भारतीय चाहत्यांविरोधात वर्णद्वेषी वक्तव्ये; VIDEO व्हायरल!

Published On: 

मुंबई : एजबॅस्टन येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात वर्णद्वेषाचे प्रकरण समोर आले आहे. एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी विरोधी संघाच्या चाहत्यांकडून भारतीय चाहत्यांवर वर्णद्वेषी कमेंट केल्या जात असल्याचा आरोप भारताच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. एरिक हॉलीच्या स्टँड्समध्ये भारतीय चाहत्यांना वांशिक अत्याचाराचा सामना करावा लागला. या प्रकरणी ईसीबीने चौकशी करण्याचे सांगितले आहे.

कसोटीच्या चौथ्या दिवशी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एजबॅस्टनच्या अधिकाऱ्यांनी माफी मागितली असून, लवकरात लवकर या प्रकरणाची सखोल चौकशी करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांनी ट्वीट केले, ”आम्हाला हे वाचून खूप दु:ख झाले आणि आम्ही अशा वर्तनाचा तीव्र निषेध करतो.”

माजी कर्णधार जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांच्या दमदार फलंदाजीमुळे इंग्लंडने भारताविरुद्धच्या (ENG vs IND) पाचव्या कसोटीत दमदार पुनरागमन केले आहे. यजमानांनी चौथ्या दिवस अखेर दुसऱ्या डावात ३ बाद २५९ धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी अजूनही ११९ धावांची गरज आहे तर भारताला आणखी ७ विकेट्सची आवश्यकता आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर झालेल्या या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर आटोपला आणि यजमानांना विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य दिले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!