मुंबई : वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी क्रिकेटच्या क्षेत्रात खूप यश मिळवले आहे. क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांमध्ये रिचर्ड्स यांचे नाव घेतले जाते. आता त्यांना वेस्ट इंडिजमध्ये मोठ्या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. रिचर्ड्स यांना ऑर्डर ऑफ द कॅरिबियन समुदायाने सन्मानित करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रिचर्ड्स यांचा पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे.
ऑर्डर ऑफ द कम्युनिटी हा कॅरिबियन समाजासाठी केलेल्या चांगल्या कामांसाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती समुदायाच्या सदस्य देशांमध्ये आरामात प्रवास करू शकते. त्या व्यक्तीला एक कागद दिला जातो ज्याचे महत्त्व डिप्लोमॅटिक पासपोर्टच्या बरोबरीचे असते. यासोबतच ती व्यक्ती सदस्य देशांमध्ये आरामात काम करू शकते आणि तेथे मालमत्ता खरेदी-विक्रीही करू शकते.
CWI congratulates @ivivianrichards on receiving Order of the Caribbean Community award????????????
Read article here⬇️https://t.co/aYpDqEQrse pic.twitter.com/XiedzCczxB
— Windies Cricket (@windiescricket) July 4, 2022
७० वर्षीय रिचर्ड्स यांनी १९७४ ते १९९१ दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. त्यांनी वेस्ट इंडिजकडून १२१ कसोटी आणि १८७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. रिचर्ड्स यांनी कसोटीत ५० पेक्षा जास्त सरासरीने ८५४० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांनी २४ शतके, तीन द्विशतके आणि 4४५5 अर्धशतके केली आहेत. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रिचर्ड्स यांचा कसोटीत स्ट्राइक रेट ८६ पेक्षा जास्त आहे. त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४७ च्या सरासरीने ६७२१ धावा केल्या आहेत. वनडेमध्ये त्यांनी ११ शतके आणि ४५ अर्धशतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

