मुंबई : विराट कोहलीचा आणखी एक मोठा विक्रम मोडल्याच्या प्रश्नावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मेहनतीच्या जोरावर हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले. बाबर आझमला माहीत नव्हते, तरी त्याने कोहलीचा कोणता विक्रम मोडला. पत्रकाराने सांगितल्यानंतर बाबर आझमला रेकॉर्डची माहिती मिळाली.
”मी अल्लाहचे आभार मानू इच्छितो. मी खूप मेहनत केली आहे आणि त्यामुळेच मी इतकी चांगली कामगिरी करू शकलो आहे”, असे बाबरने सांगितले. ताज्या आयसीसी क्रमवारीत बाबर आझम टी-२० मध्ये नंबर एक फलंदाज कायम आहे. यासह, बाबरने आता सर्वात जास्त काळ पहिल्या क्रमांकावर राहण्याचा विक्रम केला आहे. गेल्या १०३० दिवसांपासून तो अव्वल स्थानावर आहे. याआधी हा विक्रम कोहलीच्या नावावर होता, जो गेल्या दशकात १०१३ दिवस अव्वल स्थानावर राहिला.
बाबर आझम हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रन मशिन बनला आहे आणि या कारणास्तव तो या दोन्ही फॉरमॅटच्या क्रमवारीत नंबर एक फलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अद्याप फारसे यश मिळाले नसले तरी आगामी काळात कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून अव्वल स्थान गाठायचे आहे, असे त्याने स्पष्टपणे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

