🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कायम चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यामुळे केतकीला अटक करण्यात आली होती. अटकेनंतर जवळपास ४१ दिवस दिवस ती जेलमध्ये होती. नंतर तिला जामीन मिळल्यानंत तिच्या काही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. नुकतीच केतकी तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
“पवार म्हणजे धर्म नाही”, असं वक्तव्य केतकी चितळेने केले आहे. पुढे केतकी चितळे म्हणाली, ” एखादी पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याने तिच्याविरोधात कारवाई करण्यात आली, अशी प्रतिक्रिया केतकीने जामीन मिळाल्यानंतर दिली होती. मला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता बेकायदेशीररित्या पोलिसांनी मला घरातून नेले. हा देखील गुन्हाच आहे”.
महाराष्ट्रातील वगेवेगळ्या जिल्ह्यांमध्ये केतकीच्या विरोधात २२ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. ” मी सध्या २२ गुन्हनविरोधात न्यायालयामध्ये लढा देत आहे. २२ पैकी फक्त मला एका गुन्ह्यात जामीन मिळाला असून अजून २१ प्रकरणे बाकी आहेत. असं केतकी चितळेन स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
