Share

मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :  मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन होऊन 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या शाखेचा वर्धापनदिन आज असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे औरंगाबादला सभा घेत आहेत. त्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत भाषण करत भाजपवर निशाणा साधला.

“औरंगाबादमधील जनसमुदायाच्या लाटांचा फटका भाजपाला बसला तर पाणी मागायला देखील उठणार नाही. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी उठलेली जनतेची ही लाट दिल्लीला देखील झटका देईल. महाराष्ट्र कुणाचा हे सांगणारी ही सभा आहे. काहींनी याच मैदानात सभा घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच महागाई, इंधन दरवाढ यावरून लक्ष हटवण्यासाठी भाजपने आक्रोश मोर्चा काढला. मात्र भाजपच्या नामर्द लोकांनी काश्मीरमध्ये जाऊन आक्रोश पाहावा. असा टोला संजय राऊत यांनी लगावला. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांचा हिमरू शाल देऊन सत्कार करण्यात आला. आता उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!