🕒 1 min read
औरंगाबाद : ज्या मैदानावर हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी सभा गाजवली होती, त्याच मैदानावर आज मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन होऊन 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या शाखेचा वर्धापनदिन आज असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे औरंगाबादला सभा घेत आहेत. त्यापूर्वी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाषण करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला.
“जसा उद्धव ठाकरे यांना भाजपावाल्यांनी धोका दिला, तसाच धोका मला औरंगाबादमध्ये भाजपाने दिला. भाजपावाले मातोश्रीवर येत असतील, ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचं काम केलं. आम्ही ते सहन करणार नाही. किरीट सोमय्यांनी परत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तर थोबाड लाल करू”, असा इशारा चंद्रकातं खैरे यांनी दिला आहे.
दरम्यान यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांचीही उपस्थिती याठिकाणी आहे. आता उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सलमान खान धमकी प्रकरण, लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी मुंबई पोलीस पोहचले दिल्लीत
- मिताली राजने विश्वचषकात पाकिस्तानी संघाच्या गोलंदाजांचे उडवले होते छक्के; वाचा!
- Aurangabad : मुख्यमंत्री ठाकरेंच्या सभेपूर्वीच राडा; पाणी प्रश्नांवर निवेदन देणाऱ्या भाजप नेत्यांना अटक
- ‘या’ तारखेनंतर धो-धो बरसणार मान्सून; वाचा सविस्तर माहिती
- शिवसेनेच्या मंचावर संभाजीराजेंचा पूर्णाकृती पुतळा; शालिनी ठाकरेंनी म्हटले होते, “पुतळा स्टेजवर आणून ठेवतील पण…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
