Share

‘शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य लढून मिळवलं, भिकेत मिळालं नाही’

Published On: 

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नरमाई भूमिका घेत शुक्रवारी कृषी कायदे रद्द केले असल्याची घोषणा केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangna Ranut) हिने भारताच्या स्वातंत्र्याबाबत वक्तव्य केलं होतं. ‘भारताला 1947 साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 सालीच मिळालं’ कंगनाच्या या वक्तव्यावरुन सर्व स्तरातून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कंगना रणौत आणि भाजपला खोचक टोला लगावला आहे.

शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळवलं आहे. भिकेत मिळालं नाही, असा म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि अभिनेत्री कंगना रणावतला खोचक टोला लगावला आहे.

दीड वर्षापासून शेतकरी ज्या तणाव, दबाव आणि दहशतीखाली होता. त्याचे जोखड आता निघाले आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय असतं? कंगना रणौत सांगते ते स्वातंत्र्य नाही किंवा विक्रम गोखले (Vikram Gokhale) म्हणतात, ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरचं जोखड निघून जातं, फेकलं जातं. ते स्वातंत्र्य असत, असा टोमणाही यावेळी संजय राऊतांनी मारला आहे.

तीन काळे कायदे रद्द होत आहेत, शेतकऱ्यांसाठी हा स्वातंत्र्य दिनच आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं. भिकेत मिळवलेलं नाही, असा चिमटाही संजय राऊतांनी काढला आहे. 700 शेतकऱ्यांनी बलिदान दिलं. जालियनबागेत ब्रिटिशांनी आमच्या वीरांना चिरडलं. त्याच पद्धतीने लखीमपूर खेरीतही या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी शेतकऱ्यांना चिरडून मारलं. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने मला आजची सकाळ स्वातंत्र्याची पहाट वाटतेय, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!