बुलडाणा: छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईतील अरबी समुद्रात भव्यदिव्य स्मारक होणार आहे. या स्मारकाचे काम सध्या सुरु आहे. मात्र त्याला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध केला आहे. राजमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्त संभाजी ब्रिगेडकडून (Sambhaji Brigade) सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांचे पूजन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे (Manoj Akhare) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
राजमाता जिजाऊ यांचा ४२४ व्या जिजाऊ जन्मोत्सवाची सुरुवात सिंधखेडराजा येथील राजवाड्यातील जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन करून झाली. यावेळी आज सकाळी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि वंशज यांनी माँसाहेब जिजाऊ यांचे पूजन केले. कोरोनामुळे यावर्षीचा जिजाऊ जन्मोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मराठा सेवा संघाने आवाहन केल्यानुसार यावर्षी फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला.
या जन्मोत्सवावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील उभारण्यात येणाऱ्या स्मारकाला विरोध असल्याचे यावेळी सांगितले आहे. अरबी समुद्रात स्मारक उभारण्याऐवजी राजभवनाच्या जागेवर उभारण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तसेच स्मारक बनवण्यासाठी संभाजी ब्रिगेडकडून राज्यभरात मोहीम राबवली जाणार आहे. १९ फेब्रुवारीच्या आधी संभाजी ब्रिगेडचे कार्यक्रते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतची भूमिका मांडणार आहेत. राजभवनाची जागा उपलब्ध करून दिली तर संभाजी ब्रिगेड गावागावात जाऊन निधी उभारणीचे काम करणार आहे. तशी माहिती संभाजी ब्रिगेडने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाउंट हॅक, नाव आणि प्रोफाईल फोटो बदलला
- “…याची भविष्यवाणी या पोपटाने कधीच केली होती”, जितेंद्र आव्हाडांचा भाजपला खोचक टोला
- पुन्हा-पुन्हा बुस्टर डोस देणे हे चांगले धोरण नाही; WHO चा इशारा
- प्रताप सरनाईकांवर सरकारची कृपादृष्टी? ‘तो’ प्रश्न आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत मांडणार
- शरद पवार पंतप्रधान होणार?, नवाब मलिकांनी दिले स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

