नेदरलँड : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) या विषाणुने जगभरात थैमान घातले आहे. आता जागतिक आरोग्य संघटना (WHO) व औषधी नियामक संस्थेच्या (EU) विशेषज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, यानंतर संपूर्ण जगाला कोरोना विषाणूशी संघर्ष करत जगावे लागणार आहे. युरोपातील औषधी नियंत्रण आयोगाने मंगळवारी स्पष्ट केले की, कोरोना महामारी यानंतरही अशीच रहाणार आहे. मानवाला या विषाणूशी संघर्ष करत जगावे लागणार आहे. तसेच चौथ्या डोसाबाबत संभ्रम व्यक्त केला आहे. पुन्हा पुन्हा बुस्टर डोस देणे हे चांगले धोरण नाही, असे WHO ने स्पष्ट केले आहे.
युरोपीयन मेडिसिन एजन्सी (EMA) चे लसीकरण प्रमुख मार्को केवलेरी म्हणाले, ‘हे कोणालाच माहित नाही की, कोविड रुपी या बोगद्याच्या अंतिम टोकाला आपण कधी पोहचू. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. आपण हे विसरता कामा नये, की आपण या महामारीत जगत आहोत. यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला होता की, यानंतरच्या दोन महिन्यात यूरोप खंडातील अध्याहून अधिक व्यक्ती ओमायक्रॉन पॉझिटीव्ह होण्याचा अंदाज आहे. तसेच वारंवार बुस्टर डोस देणे हे चांगले धोरण नाही.
महत्वाच्या बातम्या
- “…तर तुमचा मेंदू कुठे आहे तेवढा तपासून पाहा”, पवारांवर केलेल्या टीकेवर आव्हाडांचे प्रत्युत्तर
- रेल्वे सुरक्षा दलात भरतीची ‘ती’ प्रसिद्ध झालेली जाहिरात बोगस?; रेल्वे प्रशासनाने दिली माहिती
- युपीत भाजपला मोठा धक्का; ‘या’ मंत्र्याने केला सपामध्ये प्रवेश
- ‘आता पर्यंत आम्ही तुम्हा खूप…’; न्यायालयाचा परमबीरसिंग यांना दणका
- “पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही”, पडळकरांना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

