Share

प्रताप सरनाईकांवर सरकारची कृपादृष्टी? ‘तो’ प्रश्न आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत मांडणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Saranaik) यांच्यावर ठाकरे सरकारची खूपच कृपादृष्टी आहे काय, असे प्रश्न आता उपस्थित होत आहे. सरनाईक यांच्या ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत येणार आहे. त्यामुळे या चर्चांना आता उधान आले आहे. इतकेच नाही तर महापालिकेला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा आदेशही दिला जाणार असल्याचेही आता म्हटले जात आहे.

आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत हे झाले तर एका आमदारासाठी मंत्रिमंडळात, असा निर्णय घेण्याची कदाचित ही पहिलीच वेळ ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयावरून भाजपकडून ठाकरे सरकारला घेरले जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांच्या करमाफीच्या निर्णयाला मंजूरी मिळणार आहे.त्यामुळे मुंबईकरांना आज मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय आजच्या बैठकीत स्कूल बस चालकांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्कूल बस मालकांनाही लॉकडाऊन काळातील वार्षिक वाहन करात १०० टक्के सवलत मिळण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र यात प्रताप सरनाईक यांचा मुद्दा अधिकच गाजणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!