Share

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाउंट हॅक, नाव आणि प्रोफाईल फोटो बदलला

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते. हॅकर्सने या ट्विटर अकाउंटचे नाव आणि प्रोफाईल फोटोही बदलला होता. यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते. त्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचेही अकाउंट हॅक झाले होते. प्रोफाईलवर एलोन मास्क असे नाव दिले होते तर प्रोफाईल फोटोला माशाचा फोटो अपलोड केला होता.

याप्रकरणी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting) माहिती देताना सांगितले की, आज (१२ जानेवारी) सकाळी मंत्रालयाच्या खात्यात छेडछाड झाली होती, ती दुरुस्त करण्यात आली आहे. मंत्रालयाने ट्विट केले की, ‘ट्विटर अकाऊंट रिस्टोअर करण्यात आले आहे.’

डिसेंबर २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर (PM Narendra Modi) हॅक झाले होते. या ट्विटर अकाउंटवरुन असे ट्विट करण्यात आले होते की, भारताने बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली आहे. हे ट्विट झाल्यानंतर सायबर यंत्रणेने काही वेळेतच त्यात तातडीने दुरुस्ती केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!