🕒 1 min read
Amol Kolhe | दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारण तापलेलं असताना अजून एका वादाची यात भर पडली आहे. संसदेत शिवाजी महाराजांविषयी बोलायला गेलो, तर माईक बंद केला असा आरोप खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये होत असताना यासंदर्भात संसदेने खास कायदा करावा, अशी मागणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे लोकसभेत बोलायला उभे राहिले. पण त्यांच्या ३ वाक्यानंतरच त्यांचा माईक बंद करुन पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल (Rajendra Agrawal) यांनी त्यांचा आवाज दाबला.
छत्रपती शिवराय देव नाहीत पण देवापेक्षा आम्हाला कमी नाहीत. त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करण्याची कुणाची हिम्मत होता कामा नये, असे अमोल कोल्हे सांगत असतानाच पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी “हो गया हो गया…” म्हणत विषय पूर्ण करण्याची सूचना केली. त्यानंतर पुढच्याच सेकंदाला अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा माईक बंद करण्यात आला.
या प्रकारानंतर बाहेर येऊन खासदार अमोल कोल्हे यांनी या विरोधात आपला एक व्हीडिओ बनवला. त्यात संसदेत शिवाजी महाराजांविषयी बोलायला गेलो तर माईक बंद केला, माईक बंद केला तरी शिवाजी महाराजांविषयी भावना दाबता येणार नाहीत, तो तमाम शिवभक्तांचा आवाज, कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar | “…मग एकतर्फी निकाल लागणारच”; गुजरात निकालावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य
- Gujarat Election Results 2022 | पूल कोसळून १३४ जणांचा बळी गेलेल्या मोरबीमध्ये भाजप उमेदवार विजयी!
- World Test Championship | काय करणार BCCI?, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि आयपीएल 2023 फायनल एकाच वेळी
- Sanjay Raut | “शिवाजी महाराज यांचा अपमान जनतेने विसरायला हवा, म्हणून भाजपाने…”; संजय राऊतांचा आरोप काय?
- Gujarat Election Results 2022 | गुजरात निकालांवर नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
