🕒 1 min read
Nana Patole | अकोला : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अकोल्यातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने कुणबी होते, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलंय.
ते म्हणाले, “लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला आपल्या समाजाचे नेतृत्व तसे राहावे असे वाटणे हे काही गैर नाही. कुणबी समाजाने राज्याला नेतृत्व दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने कुणबी होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य कसे असावे याचे राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे समाजाचे नेतृत्व राहावे, ही काळाची गरज आहे. कुणबी समाज हा अन्नदाता आहे, देशाचा पोशिंदा आहे.”
पुढे ते म्हणाले, “राज्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्या तुम्ही करू नका. ज्या व्यवस्थेने तुम्हाला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे, त्या व्यवस्थेला आत्महत्या करण्यास तुम्ही भाग पाडा, असे आवाहन करण्यासाठी मी इथे आलो आहे.”
‘कुणबी समाज, ओबीसी समाजामध्ये माझ्यापेक्षा ही अनेक नेतृत्व आहेत. काय असतं की वेळ आणि नशीब हे प्रत्येकाचे कसे असते हे त्यावर अवलंबून आहे. प्रत्येकाला समाजाचे देणे लागते. प्रत्येकाची समाजासाठी कार्य करण्याची जबाबदारी असते, असंही ते यावेळी बोलताना म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- Hair Care Tips | केसांना निरोगी ठेवण्यासाठी करा दह्यासोबत ‘या’ गोष्टींचा उपयोग
- Jitendra Awhad | “आनंद दिघेंना जामिनासाठी शरद पवारांनी मदत केली”; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला ‘तो’ किस्सा
- Anil Deshmukh | मोठी बातमी! अनिल देशमुखांना सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर
- IND vs AUS | भारतीय महिला क्रिकेट मधील अविस्मरणीय क्षण, व्हायरल झाली विक्ट्री क्लीप
- Shahrukh Khan | ‘पठाण’च्या प्रदर्शनापूर्वी किंग खान पोहोचला माता वैष्णोदेवीच्या दारात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
