Share

“गोपीनाथ मुंडेंना विसरलेली भाजप, त्यांनी केलेल्या महायुतीला तरी कशी जिवंत ठेवणार?”

Published On: 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एन्ट्री केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी भाजपला चांगलेच निशाण्यावर धरले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपला कोणत्याही युतीची गरज नसल्याचे वक्तव्य केले आहे.

आगामी काळात भाजप पक्ष इतका मजबूत करुया की, पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला ताकद देऊया. कोणत्याही युतीची आवश्यकता नाही, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब (Gopinath Munde) यांना विसरलेला भाजप, त्यांनी महायुतीला तरी कशी जिवंत ठेवणार?, असा प्रश्न करित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी भाजपवर टीका केली आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात, की शरद पवार साहेबांच्या (Sharad Pawar) मुळे शिवसेनेने (Shivsena) यांना योग्य वेळी जागा दाखवली. सावधन! कमळाच्या चिन्हावर लढणारी राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष हे शेवटचा घटका मोजत आहेत, अशी टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!