🕒 1 min read
मुंबई : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाची सुरवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असतानाही सत्ताधारी-विरोधकांमधील शीतयुद्ध कायम आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर भर सभागृहामध्ये मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जोरदार टोला लगावला आहे.
राजाचा पोपट मेला पण राजाला सांगायचे कसे❓
(विधानसभा । गुरुवार, दि. 23 डिसेंबर 2021)#WinterSession2021 #Maharashtra #WinterSession pic.twitter.com/xB78GZ4KgK— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 23, 2021
राजाचा पोपट मेला पण राजाला सांगायचं कसं? मग कोणी म्हणालं त्याची मान वाकडी झाली आहे. कोणी म्हणालं तो हालचाल करत नाही. कोणी म्हणतो तो खात पित नाही. तसं आता नवाब मलिक यांचं झालं आहे त्यांचं आभार मानतो आणि अभिनंदन करतो, जे आम्ही सांगत होतो की, मुस्लिमांना या राज्यात आरक्षण मिळू शकत नाही. हे आता नवाब मलिकांनी स्पष्ट केले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, धर्माच्या आधारावर या देशात आरक्षण देता येत नाही. या संदर्भात तुम्ही ज्या इंदिरा जयसिंगचा उल्लेख करता त्यानंतर जो 5 एनचा जजमेंट आहे या दोन्ही जजमेंटमध्ये याला बेसिक स्ट्रक्चरशी जोडले आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- त्यांना माझा बाप काढून काय मिळणार?; चंद्रकांत पाटलांची आव्हाडांवर आगपाखड
- चंद्रकांत पाटलांना मेडिकल हेल्पची गरज,आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ- संजय राऊत
- “पडळकरांनी अजितदादांवर केलेले आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने…”
- वाजपेयीजींना विसरून चोर दाराने उद्योग करायचा असेल तर ते योग्य नाही- नवाब मलिक
- ‘त्याला माहित असावं माफी नाही मागितली तर फटके मिळतील म्हणून…’, निलेश राणेंची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
