🕒 1 min read
मुंबई : काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एका नराधमाने चिमुरडीच्या गळ्यावर चाकू ठेवून ठार मारण्याची धमकी देत तिच्या आईवर अनेकदा बलात्कार केला. परंतु त्यानंतर घाबरून न जाता पीडित महिलेनं मोठ्या हिमतीने पोलिस स्टेशन गाठलं त्यामुळे आरोपीला पकडता आलं. दरम्यान, या मुद्द्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे(Rupali Patil Thombre) यांनी भाष्य केले असून भाजप मधील राष्ट्रीय नेतृत्वाने भाजप नेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) आणि आशिष शेलार(Ashish Shelar) यांना समज द्यावी, असे म्हंटले आहे.
यासंदर्भात रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,’अन्याय झालेल्या महिला मोठ्या हिमतीने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देत आहेत, कारण त्यांचा महाविकास आघाडी सरकार इथं न्याय होणार म्हणून विश्वास आहे’, असे या म्हणाल्या आहेत.
अन्याय झालेल्या महिला मोठ्या हिमतीने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देत आहेत ; कारण त्यांचा #MVA इथं न्याय होणार म्हणून विश्वास आहे .
भाजपा मधील राष्ट्रीय महिला नेतृत्वाने आपल्या पक्षातील आ.दरेकर, आ.शेलाराना समज द्यावी. #MVA मध्ये महिलावरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही @TV9Marathi— Rupali patil thombare (@Rupalispeak) December 22, 2021
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या आहेत की,’भाजपा मधील राष्ट्रीय महिला नेतृत्वाने आपल्या पक्षातील आ.दरेकर, आ.शेलाराना समज द्यावी.’ तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये महिलांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस; विविध मुद्यांवरुन भाजपा ठाकरे सरकारला घेरणार?
- “अमित शहा मस्त असले तरी त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त आहेत”
- ‘शिवसेनेला पोकळ आव्हाने देण्यापेक्षा लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांशी लढून दाखवा’
- चिंताजनक! ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावाने इस्त्रायलमध्ये पहिला मृत्यू
- “एकच गुन्हा महाविकास आघाडी सरकार पुन्हा…”, भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
