Share

त्यांना माझा बाप काढून काय मिळणार?; चंद्रकांत पाटलांची आव्हाडांवर आगपाखड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी सुरु झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात कलगितुरा रंगल्याचे पाहायला मिळाला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांचा बाप काढला होता. आव्हाडांच्या या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. ‘आव्हाड माझा बाप काढतात ती आव्हाडांची संस्कृती आहे. माझी नाही. माझा बाप काढून उद्धवजींच्या जवळ जावून काय मिळणार आहे? त्यांना जे मिळायचे ते मिळू देत. माझ्या बापाने निवडणूक लढवली नव्हती. ते मिलमध्ये काम करत होते. त्यांचा अपघात झाल्यानंतर 11 महिन्यानंतर ते मिलमध्ये रुजू झाले होते’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

उद्धवजींच्या तब्येतीबाबत त्यांनी मला समजून सांगण्याची गरज नाही. मला खूप कल्चर आहे. संघाने आणि माझ्या आईबापाने मला संस्कार दिले आहेत. उद्धवजींची तब्येत बरी होण्यासाठी मला प्रदर्शन करण्याची गरज नाही. मी रोज प्रार्थना करत असतो या माणसाच्या आयुष्यात काय आहे. त्यांना आराम मिळावा ही सर्व देवतांना प्रार्थना करत असतो. ते मुख्यमंत्री आहेत. आजारी असताना त्यांनी विधानसभेत येण्याचा हट्ट धरू नये. त्यांनी दुसऱ्यांना जबाबदारी द्यावी, असेही चंद्रकांत पाटलांनी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!