पणजी – गोव्यात जाणाऱ्या सिंधुदुर्गच्या गाड्यांना कोविड नियमात शिथिलता देण्याचा विचार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाला तशा सूचना देण्याची देखील तयारी केली आहे. सिंधुदुर्गच्या लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने याबाबत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.
महाराष्ट्र-गोवा सीमेवरील तपासणी नाक्यांवर गोव्यातील पोलिसांनी कडक तपासणी करू, नये अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून काल सावंत यांच्याकडे करण्यात आली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेत त्यांनी हा निर्णय घेतल्याचं भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दररोज अंदाजे १८००० युवा नोकरी धंदा निमित्त गोव्याला जात असतात;परंतु त्यांना RTPCR टेस्ट सक्तीची केली असल्याने आणि गोवा राज्य प्रवेश गेट वर निर्बंध असल्याने युवा बांधवांना खूप अडचणी येत आहेत. काही युवा नाईलाजाने पोटापाण्यासाठी छुप्या आड मार्गाने गोव्यात प्रवेश करीत आहेत व त्यामुळे दुर्घटना ही घडत आहेत. यासंदर्भात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी सावंत यांनी सकारात्मक भूमिका घेत, विषय न्यायालयात असल्याने तेथे त्वरित योग्य बाजू मांडून नागरिकांना दिलासा देऊ असे आश्वासन दिले आहे. हा विषय मार्गी लागावा यासाठी माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आ.नितेश राणे,जिल्हा अध्यक्ष राजन तेली हे ही पाठपुरावा करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी मोदींची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’
- बीसीसीआयचा पीसीबीला असाही झटका, पाकविरुद्धची मालिका सोडून खेळाडू खेळणार आयपीएल
- खुशखबर! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खेळपट्टी फिरकीपटूसाठी पोषक


