Share

Travel Guide | गुलाबी थंडीमध्ये उबदारपणा अनुभवायचा असेल, तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) मध्ये फिरण्याची (Travel) वेगळीच मजा असते. या दिवसांमध्ये फिरण्यासाठी अनुकूल वातावरण असते. त्यामुळे जगभरातील पर्यटक हिवाळ्यामध्ये फिरण्यासाठी बाहेर पडतात. त्याचबरोबर काही पर्यटकांना थंडीमध्ये उबदारपणा अनुभवायला आवडतो. त्यामुळे जर तुम्ही अशा स्थळांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण बातमीचे माध्यमातून आम्ही तुम्हाला थंडीमध्ये उबदारपणा कुठे मिळेल याबद्दल माहिती सांगणार आहोत.

गोवा

गोवा हे ठिकाण तरुणांचे सगळ्यात आवडते ठिकाण आहे. त्याचबरोबर गोव्यामध्ये तुम्हाला या गुलाबी थंडीमध्ये उबदारपणा अनुभवायला मिळेल. त्याचबरोबर गोव्यामध्ये तुम्हाला कडाक्याच्या थंडीमध्ये स्वेटरची सुद्धा गरज असणार नाही. त्यामुळे या थंडीमध्ये तुम्ही गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या लाटांचा आनंद घेऊ शकतो.

कच्छ, गुजरात

गुजरातमध्ये फिरण्यासारखे अनेक ठिकाणी आहे. त्याचबरोबर जगभरातली पर्यटक खेळण्यांमध्ये गुजरातला भेट देण्यासाठी जातात. तुम्हाला पण या गुलाबी थंडीमध्ये उबदारपणा अनुभवायचा असेल, तर तुम्ही गुजरात मधील कच्छ या ठिकाणी जाऊ शकता. त्याचबरोबर येथे दरवर्षी होणारा रण उत्सव तुम्हाला अद्भुत अनुभव देईल. त्यामुळे जर तुम्ही या हिवाळ्यामध्ये गुजरात फिरण्याचा विचार करत असाल तर कच्छला नक्की भेट द्या.

कुर्ग, कर्नाटक

भारताच्या दक्षिणोत्तर भागामध्ये कर्नाटक राज्यात स्थित असलेल्या कुर्ग शहरांमध्ये तुम्हाला निसर्गाचे विलक्षण नजारे बघायला मिळतील. कुर्गला भारतातील स्कॉटलंड म्हणून देखील ओळखले जाते. या थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही कुर्गमध्ये सर्वोत्तम अनुभव घेऊ शकतात. त्याचबरोबर कुर्गमध्ये चहाचे मळे बघण्यासारखे असतात.

जैसलमेर, राजस्थान

राजस्थानमध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाण आहे. त्याचबरोबर राजस्थानमधील प्रत्येक शहरांमध्ये ऐतिहासिक वारसा दिसून येतो. हिवाळ्यामध्ये येथील हवामान सामान्य असते. पण येथील हिवाळ्याची मजा वेगळीच असते. त्यामुळे तुम्ही या थंडीमध्ये राजस्थानला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जैसलमेर शहराला नक्की भेट दिली पाहिजे. गुलाबी थंडीमध्ये तेथील तलाव, किल्ले आणि राजवाडे तुम्हाला अविस्मरणीय अनुभव देखील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!