Share

Gold Mines | सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कशी सापडली सोन्याची खाण!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) सध्या सोन्याच्या खाणी (Gold Mines) सापडल्याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये या खाणी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या खाणी शोधण्याचे काम सुरू केल्याची माहिती दिली आहे. मुंबईमध्ये एका कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत बोलले होते. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असू शकतात, असे ते म्हणाले होते. राज्यात कोळसा, बॉक्साइड, आयरन इत्यादी खनिजांसोबत सोन्याच्या खाणीही असू शकतात. त्याचबरोबर याबाबत केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. तर, त्यांच्या या दृष्टीने चाचण्या सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना माहिती देत सांगितले होते की, महाराष्ट्रामध्ये दोन सोन्याचे ब्लॉक आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात जर हे सोनं सापडलं तर महाराष्ट्रासाठी ही एक मोठी संधी असू शकते, असेही त्यांनी त्यावेळी म्हटलं. सोन्याचे हे दोन ब्लॉग कोकणातील सिंधुदुर्ग आणि विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यामध्ये जर खरंच अशा प्रकारच्या खाणी आढळून आल्या तर देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प येथे सुरू केला जाऊ शकतो. असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये खान क्षेत्रातील संधी गुंतवणुकीच्या परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत उल्लेख करून, सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिकर्म मंत्री दादा भुसे आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!