मुंबई : येत्या काही दिवसात भारत आणि इंग्लड संघादरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपुर्वी भारताने न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. मात्र इंग्लंडविरुद्ध मालिकेपुर्वी भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
आगामी भारत आणि इंग्लंड मालिकेतील इंग्लंडच्या संघाचा फिरकीपटू जॅक लिचने खेळपट्टीबद्दल एक मोठे भाष्य केले आहे. सध्या इंग्लंडमधील खेळपट्टी सुकलेल्या आहेत. त्यामुळे या खेळपट्टीवर फिरकीपटूंना चांगली साथ मिळेल असे जॅक लिच म्हणाला. ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमधील वातावरणामुळे खेळपट्टी सुकलेल्या असतात. त्यामुळे अशा खेळपट्टीवर फिरकीपटू महत्वाची भूमिका बजावु शकतो. यामुळे या खेळपट्टीवर भारतीय फिरकीपटु आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना फायदा होईल.
तसेच खेळपट्टी सुकलेल्या असल्याने याचा फायदा भारतीय फलंदाजानाही होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाकडून जॅक लिचने ४ कसोटी सामन्यात १८ गडी बाद केले होते. भारताविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी करत आगामी ऍशेज मालिकेत इंग्लंडच्या संघात स्थान पटकावण्याचे खेळाडुंचे प्रयत्न असतील.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘झिका’ मुळे चिंतेत भर तर राज्यात आज ‘इतक्या’ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
- ‘राज्याला अभिमान वाटावा असे काम मुंबई महापालिकेने केले’- उद्धव ठाकरे
- पुणे शहरात आज ३३३ रुग्ण कोरोनामुक्त, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची भर !
- ‘विमा कंपन्यांवर कडक कारवाई करा’ ; खासदार संभाजीराजे आक्रमक
- सर्व जातीधर्मांच्या लोकांना काँग्रेस कमिटी मध्ये स्थान द्या-बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

