मुंबई : सध्या राज्यात नव्या राजकीय गणितांवर चर्चा सुरू आहे. विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीसंदर्भात अनेक वेळा चर्चा ऐकायला मिळते. तसेच मनसेसोबत युती करण्याबाबत भाजपा नेत्यांनीही मागे प्रतिक्रिया दिल्या होत्या. पण अद्यापही यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाहीये. किंवा दोन्ही पक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाहीये. परंतू, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सातत्याने मनसेसोबतच्या युतीवर मत व्यक्त करत आहेत.
आता परत एकदा चंद्रकांत पाटलांनी या विषयावर भाष्य केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत एक मोठे वक्तव्य केले आहे. ‘राज ठाकरे हे मला आवडणारं राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. ते बरे बोलत नाहीत तर खरे बोलतात. त्यांनी मला क्लिप पाठवली. ती मी ऐकली आहे. एकदोन दिवसात माझी राज ठाकरेंशी भेट होणार आहे. माझ्या मनातील प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहे, असे सांगतानाच या युतीमुळे देशाच्या राजकारणावर पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे केंद्राची परवानगी घेणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि पाटील यांची भेट झाली होती. त्यानंतर भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले. याबद्दल राज यांनी पाच दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘भूमिका स्पष्ट काय करायच्या, माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. मी आतापर्यंत ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या अगदी स्पष्ट आहेत. महाराष्ट्र हिताच्या भूमिका आहेत. त्यासोबतच देशहिताच्या सुद्धा भूमिका मांडल्या आहेत. प्रत्येक राज्याने आपआपली भूमिका कशी निभावली पाहिजे आणि काय काय केले पाहिजे.
तुम्ही आमच्यावर आक्रमक केले नाही पाहिजे आणि आम्ही तुमच्यावर आक्रमण करत नाहीयेत. भूमिकांना विरोध आहे, व्यक्तींना विरोध नाही. माझा नरेंद्र मोदींना विरोध नाही आणि अमित शहांनाही नाहीये, वैयक्तिक देणघेणं नाहीये. ज्या भूमिका नाही पटल्या त्याचा विरोध केला आणि ज्या भूमिका पटल्या त्यांबाबत अभिनंदनही केलं आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’
- बीसीसीआयचा पीसीबीला असाही झटका, पाकविरुद्धची मालिका सोडून खेळाडू खेळणार आयपीएल
- खुशखबर! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खेळपट्टी फिरकीपटूसाठी पोषक
- ‘झिका’ मुळे चिंतेत भर तर राज्यात आज ‘इतक्या’ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
