Share

Congress | गोव्यामध्ये काँग्रेसचे आठ आमदार फुटले, भाजपमध्ये करणार प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

पणजी : गोवा मध्ये ऑपरेशन लोटस ची हालचाल सुरू असल्याची चर्चा असून विधानसभा निवडणुकीला पाच महिने झाले आहेत. त्यानंतर आता काँग्रेसला मोठं खिंडार पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. अशातच काँग्रेस पक्षाचे आठ आमदार फुटले असून ते भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

गोवा मध्ये काँग्रेस पक्षाला धक्काः

गोव्यात भाजपचे प्रधान प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी अजब दावा केला होता. काँग्रेसचे आकरापैकी आठ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा त्यांनी म्हटलं होतं. गोवा विधानसभेची सदस्य संख्या 40 आहेत. मात्र सध्या काँग्रेसकडे 18 आणि भाजपचे 20 आमदार आहेत.

दरम्यान, जुलै २०१९मध्ये काँग्रेसचे दहा आमदार एकत्र भाजपमध्ये दखल झाले होते. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. अशातच काँग्रेसला गोव्यामध्ये मोठा धक्का बसला असल्याचं दिसून येत आहे. भारत जोडो यात्रेचा आठवा दिवस आहे. तसेच कन्याकुमारी ते काश्मीर असा हा प्रवास आहे.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत बंड करून उद्धव ठाकरे यांना मोठा झटका देत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यत सत्तांतर झाल्यानंतर भाजप अनेक ठिकाणी त्यांचं मिशन लोटस करत असल्याच्या चर्चा रंगत होत्या. अशातच महाराष्ट्र नंतर पुढचं टार्गेट आता गोवा होतं, अशी चर्चा देखील होती.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!