🕒 1 min read
महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) सध्या सोन्याच्या खाणी (Gold Mines) सापडल्याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये या खाणी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे याबद्दल एका कार्यक्रमांमध्ये बोलले होते. अशात नागपूर जिल्ह्यातही सोन्याच्या खाणी असल्याचा अंदाज भूगर्भ सर्वेक्षण विभागाने व्यक्त केला आहे. नागपूर जिल्ह्यातील पश्चिम ब्लॉकमध्ये परसोडी परिसरात या खाणी असल्याची माहिती जीएसआयने दिली आहे.
नागपूर जिल्ह्यातील परसोडी, किताळी, मारुपर आणि भंडारा जिल्ह्यातील भीमसेन किल्ला पहाड येथे या सोन्याच्या खाणी असल्याची माहिती जीसीआयने दिली आहे. या ठिकाणी सर्वेक्षण करून मोठ्या प्रमाणात मूल्यवान धातूंचे साठे असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर या परिसरामध्ये सोन्याच्या खाणी देखील असण्याची शक्यता जीसीआयकडून वर्तवण्यात आली आहे.
जीसीआयने केलेल्या या सर्वेक्षणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची माहिती दिली जीसीआयने आहे. त्याचबरोबर जीसीआयने दिलेल्या खोदकाम करण्याच्या सल्ल्याकडे देखील सरकारने दुर्लक्ष केले आहे.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असू शकतात, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. राज्यात कोळसा, बॉक्साइड, आयरन इत्यादी खनिजांसोबत सोन्याच्या खाणीही असू शकतात. त्याचबरोबर याबाबत केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. तर, त्यांनी या दृष्टीने चाचण्या सुरू केल्या आहेत, अशी देखील माहिती मिळाली आहे. मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये खान क्षेत्रातील संधी गुंतवणुकीच्या परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत उल्लेख करून, सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
महत्वाच्या बातम्या
- Cholesterol Control | ‘या’ गोष्टींचे सेवन करून नियंत्रणात ठेवता येऊ शकते चांगले कोलेस्ट्रॉल
- World Soil Day | का साजरा केला जातो जागतिक मृदा दिवस?, जाणून घ्या
- Electric Scooter | ‘या’ आहेत टॉप इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येईल PM किसान योजनेचा 13 वा हप्ता
- Diabetes | डायबिटीसपासून आराम मिळवण्यासाठी आहारात ‘या’ भाज्यांचा करा समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
