🕒 1 min read
मुंबई : काश्मीर प्रीमीयर लीग स्पर्धेवरून सध्या बीसीसीआय आणि पीसीबी दोन्ही क्रिकेट बोर्डात वाद सुरु आहे. या वादात अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी उडी घेतली आहे. यादरम्यान बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एक नवा दणका दिला आहे.
येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएई येथे आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरीत सामने होणार आहे. याच काळात अनेक देशांचे आंतरराष्ट्रीय सामने आहेत. याच काळात न्युझीलंडचा संघ हा पाकिस्तानचा दौरा करणार आहे. मात्र न्युझीलंडचे प्रमुख खेळाडू हे पाकिस्तान दौऱ्याला न जाता युएईमध्ये होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत सहभागी होणार आहे. न्युझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन आणि जिमी निशम हे खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही. यादरम्यान हे खेळाडू आयपीएल स्पर्धेत सहभाग नोंदवणार आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात न्युझीलंडचा संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहे. आगामी टी-२० विश्वचषकापुर्वी होणारे हे सामने महत्वाचे मानले जात आहे. मात्र यंदाचा टी-२० विश्वचषक हा युएईमध्येच होणार असल्याने आयपीएलमध्ये खेळण्याचा न्युझीलंडच्या खेळाडूंना फायदाच होईल. आयपीएल स्पर्धा ही १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान आयोजीत करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खुशखबर! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खेळपट्टी फिरकीपटूसाठी पोषक
- ‘झिका’ मुळे चिंतेत भर तर राज्यात आज ‘इतक्या’ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
- ‘राज्याला अभिमान वाटावा असे काम मुंबई महापालिकेने केले’- उद्धव ठाकरे
- पुणे शहरात आज ३३३ रुग्ण कोरोनामुक्त, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची भर !
- ‘विमा कंपन्यांवर कडक कारवाई करा’ ; खासदार संभाजीराजे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
