मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. सुशांत सिंगचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण करून आदरांजली वाहत आहेत. दरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दोघांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत रियाने कॅप्शन मध्ये लिहिले, “मला रोज तुझी आठवण येते…” यासोबतच रियाने हार्ट इमोजीही शेअर केला आहे.
हे फोटो सोशल मीडियावर काही मिनिटातच प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये दोघे एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहेत. पहिल्या फोटोंमध्ये रिया सुशांतच्या मागे बसून क्यूट पोज देत आहे. दुसऱ्या फोटोंमध्ये सुशांत कानामागे एक गोंडस फूल घेऊन लहान मुलासारखी पोज देत आहे आणि त्याच्या जवळ बसलेली रिया त्याच्या कृतीचे कौतुक करत आहे. दोघेही मोकळ्या मैदानात एन्जॉय करताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/CexmpoeNPZ2/
त्या दोघांचा तिसरा फोटो पाहिला तर त्यामध्ये रिया सुशांतला किस करताना दिसत आहे. त्या दोघांच्या बॉडिंगला चाहते भरभरून प्रेम देत आहेत. रियाची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याचबरोबर सुशांतचे हे कधीही न पाहिलेले फोटो चाहत्यांना पुन्हा एकदा भावूक करत आहे. कमेंटमध्ये सर्व सोशल मीडिया यूजर्स सुशांतला श्रद्धांजली वाहत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


