नवी मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अयोध्येत शिवसैनिकांकडून हलगी आणि ढोल ताशा वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला. आदित्य ठाकरे उद्या १५ जून रोजी राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. यावरून मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय.
रामलल्लाचे दर्शन घेतल्यावर तरी ढोंगी हिंदुत्वाकडून खऱ्या हिंदुत्वाकडे त्यांचा प्रवास होवो हीच प्रार्थना. मशिदींवरील भोंगे उतरवावे, रस्त्यावरील नमाज बंद व्हाव्यात आणि बाळासाहेबांचे स्वप्न म्हणजे औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करावे, याची सुदबुद्धी मिळावी असे वक्तव्य मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या –


