Share

मलिक आणि देशमुखांची पुन्हा हायकोर्टात धाव ; विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याची मागितली परवानगी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी 20 जूनला तुरुंगातून सोडण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली.

विशेष पीएमएलए न्यायालयाने देशमुख आणि मलिक यांना राज्यसभा निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे 10 जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत त्यांना मतदान करता आले नाही. कनिष्ठ न्यायालयाचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानेही कायम ठेवला होता. दरम्यान दोघांनी आता विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी 20 जून रोजी एक दिवसासाठी तुरुंगातून सोडण्याची विनंती केली आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री देशमुख यांनी एक दिवसाची तुरुंगातून सुटका करण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी 15 जूनला सुनावणी होणार आहे.

तसेच मुंबई अंडरवर्ल्ड, फरार डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

तसेच दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका वाहनात स्फोटके सापडल्याप्रकरणी ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी वाझेला गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक करण्यात आली होती. वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील रेस्टॉरंट आणि बारमधून दरमहा १०० कोटी रुपये उकळण्याचे काम पोलीस अधिकाऱ्यांवर सोपवले होते, असा आरोप केला होता. दरम्यान देशमुख आता तुरुंगात आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!