Share

गौतम गंभीरने दिला नुपूर शर्मा यांना पाठिंबा, यावर अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणाली…

Published On: 

मुंबई : भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. या वक्तव्यावरून नुपूर शर्माला भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी याबाबतीत माफीही मागितली आहे. पण त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे नुपूर यांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्त्द्वारे सांगितले. यामध्ये आता गौतम गंभीरने नुपूर शर्मा यांना पाठिंबा देत एक ट्विट केले आहे. या ट्विटवर अभिनेत्री स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली आहे.

माफी मागून देखील महिलेला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. हे सर्व घडत असताना तथाकथित सेक्युलर लिबरल्सने बाळगलेले मौन चीड आणणारे आहे. असं ट्विट गौतम गंभीर याने केले आहे. यावर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने प्रतिक्रिया दिली आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर गौतमचे ट्विट शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले, ‘इनको बुलढोजर की आवाज नहीं सुनाई पड रही लेकिन’.

याआधी कंगना रणौतने देखील प्रतिक्रिया दिली होती –

कंगना रणौत म्हणाली, नुपुरला आपले म्हणणे सर्वांसमोर मांडण्याचा अधिकार आहे, पण तिला धमकावले जात आहे. जेव्हा हिंदू देवतांचा अपमान होईल, तेव्हा आम्ही न्यायासाठी कोर्टात जाऊ. “चला दरवाजा ठोठावू आणि ते प्रत्येकासाठी असले पाहिजे. स्वतःला डॉन समजण्याचा प्रयत्न करू नका. पुढे कंगना म्हणाली, “हा अफगाणिस्तान नाही. जे विसरले आहेत त्यांना मी आठवण करून देते की आपल्याकडे एक चांगले सरकार आहे, जे लोकशाही व्यवस्थेद्वारे निवडले गेले आहे”.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!