मुंबई : ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट २० मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी अभिनित ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल १४ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाला एवढं प्रेम दिल्याबद्दल कार्तिकने चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचवेळी, आता कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो त्याच्या खास व्यक्तीसोबत रविवार घालवताना दिसत आहे.
कार्तिक आर्यनने त्याचा रविवार त्याच्या गोंडस कुत्र्यासोबत घालवला आहे. त्याचे फोटो कार्तिकने त्याच्या इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये कार्तिक आपल्या कुत्र्यासोबत सेल्फी घेत आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये कार्तिक त्याच्या लाडक्या कुत्र्याला किस करताना दिसत आहे. फोटो शेअर करत कार्तिकने कॅप्शन मध्ये लिहिले कि, ‘रविवार माझ्या उशीसोबत’.
https://www.instagram.com/p/Ceth0ZMNzHh/
कार्तिकच्या ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा एक हॉरर, कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये कार्तिक आर्यनने अप्रतिम काम केले आहे. कार्तिक व्यतिरिक्त या चित्रपटात कियारा अडवाणी, तब्बू, राजपाल यादव आणि संजय मिश्रा सारखे कलाकार होते. या चित्रपटाने आतापर्यंत 171 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या :


