Share

“मजबूत राष्ट्रपती हवा असेल तर शरद पवारांना पाठिंबा द्या” ; संजय राऊतांचा भाजपला सल्ला

Published On: 

मुंबई: पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीच्या तयारीला अनेक पक्ष लागले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची उद्या विरोधी पक्षांसोबत एक बैठक होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

“भाजपला जर देशाला मजबूत राष्ट्रपती द्यायचा असेल, संविधानाचं रक्षण करणारा राष्ट्रपती द्यायचा असेल तर त्यांनी शरद पवार यांनाच पाठिंबा दिला पाहिजे. देश उभा करायचा आहे. या देशाच्या घटनेचं रक्षण करायचं आहे. या देशातील जनतेचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे. या देशाला एखाद्या नेत्याच्या अनुभव होणार असेल तर तो नेता फक्त शरद पवारच आहेत. पण राज्यकर्त्यांचं मन त्यासाठी मोठं असावं लागतं. मन मोठं असेल तर ते अशा प्रकारचा निर्णय घेतात” असे संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत हे सध्या अयोध्या दौऱ्यावरती आहेत. याच दरम्यान त्यांनी राष्ट्रपतीपदाबाबतच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी विरोधी आघाडीचं नेतृत्व केलं पाहिजे. देशात आणि विरोधी पक्षात त्यांच्यासारखा अनुभवी आणि प्रभावी नेता नाही. राष्ट्रपतीपदासाठी उभं राहण्यासाठी त्यांनी अनुकूलता दर्शवली तर या निकालात फेरफार होऊ शकतो. पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. राजकारणापलिकडे आणि पक्षाच्या पलिकडे आहे. हे सर्व लोक पवारांच्या मागे उभे राहतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा मजबूत असावा. विरोधी पक्षाचा असला तरी हा चेहरा राष्ट्रपतीपदाचा असावा असं जनतेला वाटावं. तो उभा करणं महत्त्वाचा आहे. तसा चेहरा दिल्यास उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असेही राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!