मुंबई : महाराष्ट्राच्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित या सर्वांचे उमेदवारी अर्ज आता दाखल करण्यात येणार आहेत.
भाजपने पाच उमेदवारींची नावे जाहीर केली आहेत, त्यामध्ये माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव आहे. भाजपकडून राम शिंदे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून प्रतिक्रिया दिली आहे.