मुंबई : कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला पंधरा दिवस होऊन गेले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने गेल्या १९ दिवसांमध्ये १५९.२३ कोटी रुपये कमवले आहेत. यामध्येच १५० कोटींच्या कमाई मधून तुला किती प्रॉफिट शेअर मिळणार असा प्रश्न एका चाहत्याने कार्तिकला विचारला. यावेळी कार्तिकने मजेशीर अंदाजामध्ये याचे उत्तर दिले.
चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देत कार्तिक म्हणाला, १५० कोटींमधला नफा मिळाला नाही पण चाहत्यांचे प्रेम मिळाले. या प्रेमापेक्षा कोणताच आकडा मोठा नाही असं लिहित त्याने हर्ट चा इमोजी पोस्ट केला. नंतर पुढे दुसऱ्या युजरने कार्तिकला विचारले ‘भूल भुलैया २’ची सगळीकडे चर्चा असताना तुला काय वाटते? त्यावर उत्तर देत कार्तिक म्हणाला, मला शहजादा असल्यासारखं वाटतय.

‘भूल भुलैया २’ चित्रपटाचे दिग्दर्शन अनिस बाजमी यांनी केले आहे. हा चित्रपट २० मे ला प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. कार्तिक आता लवकरच साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरामुलो’ या तेलगु चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या हिंदी चित्रपटाचे नाव शहजादा आहे.
महत्वाच्या बातम्या :


