Share

सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात मिका सिंगचा मोठा खुलासा, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी 30 राऊंड गोळीबार करण्यात आला. यांच्या मृत्यूने चाहत्यांना धक्का बसला आहे. यांच्या मृत्यूबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. २८ वर्षीय प्रसिद्ध पंजाबी गायकाला गुंडांकडून सतत धमक्या दिल्या जात होत्या. या हत्येनंतर अनेक प्रसिद्ध गायकांना देखील धमक्या येऊ लागल्या आहेत. यामुळे पंजाबी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक मिका सिंगची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मिका सिंगने गुंडांकडून सेलिब्रिटींना मिळणाऱ्या धमक्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. मिका यांनी इतर पंजाबी गायकांना मिळणाऱ्या धमक्यांचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले, “आमच्या इंडस्ट्रीतील प्रत्येक व्यक्तीला या दुःखद घटनेने धक्का बसला आहे. पण मी सर्वांना सांगू इच्छितो की केवळ सिद्धूलाच धमक्या येत होत्या असे नाही. तर गिप्पी ग्रेवाल, मनकिरत औलख यांसारख्या अनेक पंजाबी गायकांना धमक्या मिळाल्या आहेत. यानंतर  सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे”.

मिका यांनी त्यांच्या आणि सिद्धू मुसेवाला यांच्या नात्याबद्दल बरेच काही खुलासे केले आहे. मिका यांनी सांगितले की, “मी त्याला शेवटच मुंबई या ठिकाणी भेटलो. तो खूप खुश होता त्यावेळी कारण त्याने  विमानतळापासून माझ्या घरापर्यंत एकट्याने प्रवास केला होता. मी ४-५ वर्षापूर्वी त्याला पुरस्कारही दिला होता त्यावेळी आम्ही लंडन मध्ये भेटलो होतो. त्याने मला विचारले होत की, मी अशा धमक्यांचा सामना कसा करू शकतो. मला आता या गोष्टीचे खूप दुख होत आहे. मी त्याला मुंबई या ठिकाणी शिफ्ट व्हायला सांगितले होते”.

महत्वाच्या बातम्या : 

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!